दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण ते राज्यात लॉकडाउनची शक्यता, ठळक बातम्या एका क्लिकवर

दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण ते राज्यात लॉकडाउनची शक्यता, ठळक बातम्या एका क्लिकवर

देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाला थोपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. तरीही रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. रविवारी पुन्हा एकदा देशात दीड लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्यानं देशात चिंता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाउनची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्याबरोबर देशातही लॉकडाउन लागू शकतो असे संकेत दिले आहेत. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर......

J&K: १४ वर्षीय दहशतवादी कंठस्नान; चकमकीत आतापर्यंत १० ठार
जम्मू-काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये वारंवार चकमकी घडत आहेत. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये एका १४ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. वाचा सविस्तर
 

काळजी घ्या! देशात पुन्हा आढळले दीड लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण
करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने रविवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, खडबडून जागं करणारेच आकडे समोर आले आहेत. गेल्या २४ तासांत देशात दीड लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडूसारख्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. वाचा सविस्तर
 

राज्यातच नव्हे, देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

राज्यात शनिवारी कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्वपक्षीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीचे नेतृत्व केलं आणि कोरोनाची साखळी तोडायची असेल तर त्यासाठी लॉकडाउनशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. या बैठकीत उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनचा विरोध केला. व्यापारी आणि इतर छोट्या घटकांचा विचार करत त्यांनी लॉकडाउन अमान्य केला. त्या मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर
 

लॉकडाऊन अटळ; किमान १५ दिवसांच्या कडक निर्बंधांची शक्यता 
‘‘कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर, राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय नाही,’’ असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले. ‘‘राज्यातील जनतेचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहकार्य करा. राजकारण करू नका,’’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना केले. तर, विरोधी पक्ष असलेल्या भाजपने, ‘अगोदर मदत जाहीर करा, मगच लॉकडाउन करा,’ अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाउन विषयी सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा केली. वाचा सविस्तर
 

महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार १,१२१ व्हेंटिलेटर्स; प्रकाश जावडेकर यांची माहिती
पुणे : केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. वाचा सविस्तर
 

लॉकडाउनबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेणार? मनसेने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. विविध निर्बंध लागू करुनही ही रुग्णवाढ आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोनाची रुग्णवाढ कशी थोपवायची, या बद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. लॉकडाउन लावायचा की, नाही याबद्दल बैठकीत सर्वकष चर्चा झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी आपआपली भूमिका मांडली. आजच्या या बैठकीचे राज ठाकरेंनाही निमंत्रण होते. पण ते उपस्थित नव्हते. राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत... वाचा सविस्तर
 

Video : 'उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे'
वीकेंड लॉकडाउनला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासह कऱ्हाडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी रात्री फिरून जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याबरोबर साताऱ्याचा आढावा घेतला असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नमूद केले. सविस्तर वाचा
 

गुढीपाडव्याला गुडन्युज! म्हाडाच्या २८९० घरांची होणार सोडत
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार ८९० घरांची ऑनलाइन सोडत गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काढण्यात येणार आहे. या सोडतीचा प्रारंभ १३ एप्रिलला सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. वाचा सविस्तर
 

धोनीला दुहेरी झटका; सामना तर गमावलाच, आर्थिक दंड झाला तो वेगळाच

IPL 2021 CSK vs DC : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जचा सहज पराभव केला. मुंबई येथील वानखेडे मैदानात रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात गडी आणि 8 चेंडू राखून विजय नोंदवला. पंतच्या नेतृत्वाची दमदार सुरुवात करण्यासाठी धवन आणि पृथ्वीने दाखवलेला शो उपयुक्त ठरला. दिल्लीबरोबर पराभव स्वीकारत चेन्नईनं आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात पराभवानं केली आहे. या पराभवासोबत धोनीला आणखी एक धक्का बसला आहे. षटकांची गती मंद राखल्यामुळे आयपीएलद्वारे धोनीला दंड ठोठावण्यात आला आहे. वाचा सविस्तर
 

'लोका सांगे ब्रह्मज्ञान..', मास्क न घातल्याने सारा झाली ट्रोल
प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानदेखील मास्कशिवाय फिरताना दिसत आहे. सारा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. नुकतंच जिममधून बाहेर पडताना साराला फोटोग्राफर्सनी पाहिलं. यावेळी साराने मास्क घातला नव्हता. मास्कशिवाय बाहेर फिरतानाचे साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाचा सविस्तर...

आजींची बातच न्यारी..! वयाच्या ८८ व्या वर्षी तरुणांना देतायेत फिटनेसचे धडे
आपल्या आजुबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहायला मिळतात ज्या, खऱ्या अर्थाने त्यांच्या मनाचं तारुण्य जपतात आणि इतरांनादेखील प्रेरणा देतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ८८ वर्षीय आजींची चर्चा रंगली आहे. वयाची ८० वर्ष पार केलेल्या या आजी चक्क जीम ट्रेनर असून त्यांनी आतापर्यंत जवळपास एक हजारांपेक्षा जास्त महिलांना जीम ट्रेनिंग दिली आहे... वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com