esakal | मृतांच्या नातेवाईकांनी एकनाथ शिंदेंना घेरलं ते सुमित्रा महाजनांचा शशी थरुरांना सवाल

बोलून बातमी शोधा

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
मृतांच्या नातेवाईकांनी मंत्र्यांना घेरलं ते सुमित्रा महाजनांचा थरुरांना सवाल
sakal_logo
By
टीम ई सकाळ

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांना मृतांच्या नातेवाईकांनी घेरलं होतं. तर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचं ट्विट केलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केलं आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

मुंबई - विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आता रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरुवात केली आहे. नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाचा विरारमध्ये झालेल्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

विरार - कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांना मृतांच्या नातेवाईकांनी घेरलं होतं. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचं ट्विट केलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केलं आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, न्यूज चॅनेल्सनी कशी काय याबाबत बातमी चालवली? त्यांनी किमान एकदा इंदौर प्रशासनाला तरी विचारायचं होतं. वाचा सविस्तर

टोकियो - जपानमध्ये लसीकरण मोहीम संथगतीने होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणीचा विचार झाल्यास ऑलिंपिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटीपेक्षा अधिक असताना आतापर्यंत २१ लाखापर्यंतच लसीकरण झाले. वाचा सविस्तर

पुणे - पुणे जिल्ह्यातील ८२८ रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांमध्ये १३ हजार २५७ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वायल्स पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली. वाचा सविस्तर

नागपूर - कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या निर्धारित कर्मचाऱ्यांनी अकरा वाजताच्या आत कार्यालयात पोहचावे, अन्यथा सबळ कारण नसल्यास अशा कर्मचाऱ्यांना पोलिस ताब्यात घेतील. त्यांची चौकशीअंती विनाकारण उशिरा जात असल्याचे लक्षात आल्यास गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे, असे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर

नाशिक - महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची दुर्घटना घडून २४ तासांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतरही ऑक्सिजन टँकच्या देखभाल दुरुस्तीसह ऑक्सिजन भरण्याची जबाबदारी असलेल्या पुण्याच्या टायो निप्पॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप संपर्कही न केल्याने संशयाचे धुके गडद झाले आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन भरतानाच अधिक दाबामुळे ऑक्सिजन गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज काढल्याचे समजते. वाचा सविस्तर

सातारा - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सध्या बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या स्थितीला आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - नेहमी लखलखणारी हंड्याझुंबरं पुन्हा एकाकी झाली आहेत. दर्शनी भागात लावलेल्या भव्य समस्यांची झळाळी उदास भासत आहे. ये-जा करणाऱ्यांची अत्यल्प वर्दळ जाणवत आहे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन महाराष्ट्र सदनातील हे शांत चित्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या दिसत आहे. वाचा सविस्तर

नाशिक - डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. वाचा सविस्तर