ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांवर चीनची बंदी ते शेतकऱ्यांवर सुप्रीम कोर्टही नाराज, वाचा ठळक घडामोडी एका क्लिकवर

Morning-News
Morning-News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ काल संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच चीनने बुधवारी ट्रम्प प्रशासनातील 28 माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात बंदी आणली आहे. तर ड्रॅगन फ्रुटचे नामकरण कमळासारखे दिसते म्हणून कमलम करण्याचा निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घेतला आहे. मात्र त्याआधीच सांगलीत पाच वर्षांपूर्वी या फळाचं नामकरण गुंजाली असं करण्यात आलं आहे. दुसरीकडे भारत सरकारने उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपने प्रस्तावित गोपनीयता धोरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे.

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ काल संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच चीनने बुधवारी ट्रम्प प्रशासनातील 28 माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात बंदी आणली आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्व संपुष्टात आले असून आता डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांनी या पदाची शपथ घेतली आहे. जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यू.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सविस्तर वाचा 

सांगली : देशात शहरे आणि रस्ते बदलण्याच्या भाजपच्या मोहिमेच्या कचाट्यातून आता फळंही सुटलेली नाहीत. आता ड्रॅगन फ्रुटचे नामकरण कमळासारखे दिसते म्हणून कमलम करण्याचा निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घेतला आहे. सविस्तर वाचा

पुणे : तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या लोकांकडून लसणाच्या फायद्यांबाबत अनेकदा ऐकलं असेल. भारतीय पदार्थांमध्ये लसूण या घटकाचा वापर सर्रास केला जातो. भाजी असो वा लोणचं... जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी तसेच आपल्या शरिराला आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसूण खुपच प्रभावी मानला जातो. सविस्तर वाचा

नवी दिल्ली - भारत सरकारने उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने प्रस्तावित गोपनीयता धोरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. या धोरणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून तो दूर करण्यासाठी कंपनी काम करते आहे.  सविस्तर वाचा

नवी दिल्ली - सध्या राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पेच कायम असताना सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत यावर तोडगा काढण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.  सविस्तर वाचा

पुणे : महाविद्यालये सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून 20 तारखेपर्यंत निर्णय घेऊ अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती.  सविस्तर वाचा

मुंबई : आई-वडिलांचा विरोध असलेल्या 23 वर्षीय युवतीला तिच्या पसंतीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आंतरजातीय प्रेम प्रकरण असलेल्या तरुणाने मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. सविस्तर वाचा

नाशिक  : राज्यातील गरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नयेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. सविस्तर वाचा

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वर्षाच्या प्रारंभीच बर्ड फ्लूची भीती मात्र वाढली असून, त्यामुळे कोंबड्या खरेदी- विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकन व्यवसायाला मोठा फटकाही बसला आहे. सविस्तर वाचा

गडहिंग्लज : कोलकत्यात सुरू असणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) स्पर्धेत कोल्हापूरच्या निखिल कदमने उत्कृष्ट हेडव्दारे गोल नोंदविला. मणिपूरच्या टिडिम रोड अँथलेटिक युनियन (ट्राऊ) एफसी विरूध्द हा त्याने लक्षवेधी गोल केला. सविस्तर वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com