40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा इशारा ते हिंदू महिलांच्या संपत्तीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

morning news update 40 lakh tractors to Delhi court property of Hindu women Narendra Modi
morning news update 40 lakh tractors to Delhi court property of Hindu women Narendra Modi

हिंदू महिलेच्या माहेरच्या कुटुंबातील लोकांना तिच्या मालमत्तेचा वारसदार मानलं जाऊ शकतं. अमरोहामधील बावनखेडी हत्याकांडाची दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली. शेतकरी नेते राकेश टिकैत  (Rakesh Tikait)  यांनी केंद्र सरकारला इशारा. पेट्रोलपंपवरील बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहून पेट्रोल खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या संतापात आणखी भर. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे कर्जासाठी जाणाऱ्या बळीराजाला आता जिल्हा मध्यवर्ती बॅंक दोन ते पाच लाखांचे मॉरगेज कर्ज देणार आहे. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती बुधवारी (ता. २४) ऑनलाइन महासभेत होणार

नवी दिल्ली -  सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देताना म्हटलं की, हिंदू महिलेच्या माहेरच्या कुटुंबातील लोकांना तिच्या मालमत्तेचा वारसदार मानलं जाऊ शकतं. अशा नातेवाइकांना कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती म्हणता येणार नाही. हिंदू वारसा कायद्याच्या कलम 15.1 डी अंतर्गत हे येईल आणि मालमत्तेचे वारसदार ठरवता येईल. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- अमरोहामधील बावनखेडी हत्याकांडाची दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. वाचा सविस्तर

यवतमाळ : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थिती आटोक्‍यात न आल्यास जिल्ह्यात २६ फेब्रुवारीपासून किमान दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात येईल, असे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.वाचा सविस्तर

नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी सुरुच आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत  (Rakesh Tikait)  यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. वाचा सविस्तर

लॉस एंजिलिस - जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स्स यांच्या कारला लॉस एंजिलिसमध्ये भीषण अपघात झाला आहे. वाचा सविस्तर
 

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज (बुधवार ता. 24) होत असून, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. वाचा सविस्तर

नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून सामान्य नागरिक संतप्त आहे. त्यातच पेट्रोलपंपवरील बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहून पेट्रोल खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या संतापात आणखी भर घालत आहे. वाचा सविस्तर

पुणे - उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्कासह ठराविक रक्कम अनामत शुल्क म्हणून देखील घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे.वाचा सविस्तर


नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती बुधवारी (ता. २४) ऑनलाइन महासभेत होणार आहे.वाचा सविस्तर

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे कर्जासाठी जाणाऱ्या बळीराजाला आता जिल्हा मध्यवर्ती बॅंक दोन ते पाच लाखांचे मॉरगेज कर्ज देणार आहे. विकास कार्यकारी सोसायट्यांशिवाय बॅंक निरीक्षकांच्या माध्यमातून हे कर्जवाटप केले जाणार आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com