डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती ते पुण्याचे नामकरण, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली.

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर; कार्यकाळपूर्तीच्या आधीच गच्छंतीची नामुष्की
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. - सविस्तर वाचा

शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यावर अडकली लस घेऊन जाणारी ट्रक; बदलावा लागला मार्ग
पश्चिम बंगालच्या (West Bengal)  वर्धमान जिल्ह्यात कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनामुळे कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेऊन जाणारी ट्रक खूप वेळ रस्त्यावरच अडकून पडली होती. - सविस्तर वाचा

Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?
भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. विशेषत: सण-उत्सव, लग्न सोहळ्याला काळ्या रंगाचे कपडे वापरत नाहीत, पण तरीही संक्रांतीला काळ्याच रंगाचे कपडे घातले जातात. या मागे नक्की काय कारण आहे? चला तर मग जाणून घेऊ या. - सविस्तर वाचा

पुण्याचे नामकरण संभाजीनगर करा, औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच राहावे - आनंदराज आंबेडकर
पुण्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करा तसेच शनिवारवाड्याचे माँसाहेब जिजाऊ नामकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत केली. - सविस्तर वाचा

कोरोनाचं दुसरं वर्ष अधिक कठीण; WHO ने दिली खबरदारीची सूचना
जगात  हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या महासंकटातून आता कुठे थोडा दिलासा मिळत आहे. अनेक देशांमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लसीकरणास मंजूरी मिळाली असून लसीकरणास सुरवात देखील झाली आहे. - सविस्तर वाचा

लोकल प्रवासासाठी सामान्य नागरिक अजूनही वेटिंग लिस्टमध्ये
मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र अजूनही सामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. - सविस्तर वाचा

सिंहगड, प्रतापगडावर वाढला गोंगाट;अतिगर्दीने किल्ले प्रदूषित
पश्‍चिम महाराष्ट्राला किल्ल्यांचा वैभवशाली वारशासह निसर्गाचे सौंदर्य देखील लाभले आहे. पण किल्ल्यांची व्यवस्थित माहिती न मिळणे, पर्यटकांसाठी आवश्‍यक सुविधा नसल्याने अद्यापही अनेक किल्ले पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. - सविस्तर वाचा

वाहतूकीचे नियम मोडले, मग काय आता हे तर होणारच होतं!
वाहतूक पोलिस शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे बेशिस्‍त वाहनचालकांवर लक्ष ठेवले जाते. प्रसंगी दंडात्‍मक कारवाई केली जाते. - सविस्तर वाचा

हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले
हिंगणघाट (जि. वर्धा) येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी अंकिताच्या आई-वडिलांची साक्ष पूर्ण झाली. आईची साक्ष सुमारे दीड तास चालली. - सविस्तर वाचा

तुम्हाला कोरोनावरील लस टोचायची आहे का? लसीकरणाचा दिवस, केंद्र अन्‌ वेळेची 'अशी' मिळेल माहिती
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून प्रत्येक दिवशी 100 जणांना लस टोचली जाणार आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning news updates donald trump impeachment coronavaccine makar sankranti pune mumbai local