शिवसेना आमदाराच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक ते अर्थव्यवस्थेसाठी गुड न्यूज, महत्त्वाच्या बातम्या क्लिकवर

morming.jpg
morming.jpg

देशात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. मंगळवारी देशभरातील एकूण नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,15,000 हून अधिक असल्याचं निष्पन्न झालं आहे. याआधी 30 जानेवारी, 2020 रोजी एकदिवसीय सर्वोच्च आकडेवारीची नोंद झालेली होती. सक्तवसुली संचालनालयाने व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाली आहे. योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.


नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जबरदस्त वेग पकडला आहे. काल मंगळवारी आढळेलल्या रुग्णासंख्येने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून निघाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 1.15 लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर कार 630 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI) इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. या सेवेमध्ये एसबीआय ग्राहक आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम तपासू शकतात, निधी हस्तांतरित करू शकतात, नवीन चेकबुकसाठी विनंती करू शकतात आणि डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. या सेवांशिवाय ग्राहकांना एसबीआयमध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे मुदत ठेवी (Fixed Deposite) आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधा देखील मिळते. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : कोरोना महामारीचं संकट अद्यापही कायम आहे. भारतासारख्या देशात कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. जगभरातील स्थिती अद्याप संपूर्णपणे नियंत्रणात नाहीये. अशा पार्श्वभूमीवर या महासंकटासोबतच अनेक प्रकारच्या अफवा देखील सोशल मीडियावर पसरत आहेत. कोरोना रोगापेक्षाही या अफवाच जास्त हानीकारक असल्याचं चित्र दिसून येतंय. वाचा सविस्तर


सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशाचा राज्य सरकारने पुन्हा एकदा विचार करुन त्यामध्ये बदल करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल अशी भिती खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी समाज माध्यमातून व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर


मुंबई : मुंबईत लवकरच पालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकांना एक वर्षाचा अवकाश असला तरीदेखील भाजपाकडून पालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर भाजपाचं मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२१ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ १२.५ टक्क्यांनी होईल, असा अंदाज ‘आयएमएफ’ने वर्तविला आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. फक्त चीन या एकमेव मोठ्या अर्थव्यवस्थेची गेल्यावर्षी सकारात्मक वाढ झाली. वाचा सविस्तर

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाली आहे. योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. योगेश देशमुख यांची अटक ही प्रताप सरनाईक यांच्यासाठी एक धक्का मानला जात आहे. वाचा सविस्तर


वॉशिंग्टन : जगभरात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अजूनही कोरोनाबाबतची संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली नाहीये. जगभरात अनेक लशींना मान्यता मिळाली आहे. अनेक देशांमध्ये लशीकरणाची मोहिम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल मंगळवारी केली आहे. वाचा सविस्तर


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षा सुरू झालेल्या असताना त्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 'वेकअप एसपीपीयू' ही मोहीम सोशल मिडीयावर सुरू केली आहे. गेल्या ३ महिन्यापासून पुणे विद्यापीठ प्रशासन ऑनलाईन परीक्षांचे नियोजन करीत आहे. या सत्राची मुख्य परीक्षा येत्या १० एप्रिल पासून नियोजित आहे आणि त्या पूर्वी सध्या सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. वाचा सविस्तर


बार्शी (सोलापूर) : शहरातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पॉलिटेक्‍निक कॉलेज येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये चिखर्डे (ता. बार्शी) येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाने आत्महत्या केली असून, बार्शी शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येची माहिती समजताच इतर रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com