मशिदीची दारे महिलांसाठी खुली

मशिदीची दारे महिलांसाठी खुली

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील एका मशिदीच्या व्यवस्थापनाने परंपरेच्या बेड्या भिरकावून देत प्रार्थनागृहाची दारे महिलांसाठी खुली केली आहेत, या महिलांना शुक्रवारच्या प्रार्थनेमध्येही सहभाग घेता येईल. वर्धमान शहरातील गोडा भागातील ही मशीद सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

" परंपरेनुसार येथील मुस्लिम महिलांना केवळ ईदच्या दिवशीच मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी दिली जात असे, मागील अनेक महिन्यांपासून याबाबत मशिदीच्या व्यवस्थापन समितीमध्ये यावर चर्चा सुरू होती, अनुकूल वातावरणात, शुद्ध मनाने महिला मशिदीमध्ये नमाज अदा करू शकतात, '' असा दावा मशीद समितीचे समितीचे सचिव जिल्लूर रहेमान यांनी केला आहे. इतिहासकार, संशोधक आणि अभ्यासकांनी मशिदीच्या व्यवस्थापन समितीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राजकीय पक्षांनीदेखील हा निर्णय योग्य ठरविला आहे. तत्पूर्वी वीरभूमधील मुस्लिम महिलांनी सर्वप्रथम 2005 मध्ये ही परंपरा मोडीत काढत पुरुषांसमवेत मशिदीमध्ये प्रवेश केला होता. राज्यातील अन्य मशिदींनीदेखील अशाच प्रकारचा कित्ता गिरवला, तर सकारात्मक बदल घडून येऊ शकतो, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com