...तर ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा : देवेगौडा

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

85 वर्षीय गौडा यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सर्वानुमते ममता बॅनर्जी यांच्या नावाचा विचार झाल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल. विरोधीपक्षांकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर देवेगौडा यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 साठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना आज (रविवार) माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (एस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, की ''पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी देण्यात आली तर त्यांना आमचा पाठिंबा असेल''. 

85 वर्षीय गौडा यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सर्वानुमते ममता बॅनर्जी यांच्या नावाचा विचार झाल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल. विरोधीपक्षांकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर देवेगौडा यांनी हे वक्तव्य केले. गौडा यांच्या पक्षाचे सध्या कर्नाटकमध्ये सरकार सत्तेवर आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसची एकजुटीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 

दरम्यान, पंतप्रधानपदासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. बॅनर्जी त्यांच्याकडून बिगरभाजप पक्षाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Web Title: Most welcome if Mamata Banerjee is projected as PM says HD Deve Gowda