हुक्केरी तालुक्यात माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

हुक्केरी तालुक्यात माय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू

संकेश्वर - हुक्केरी तालुक्यातील कमतनूरमध्ये विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( ता. २७) सकाळी नऊच्या सुमारास घडली. भारती मनाेहर कमते ( वय ४०) व श्रीदेवी मनाेहर कमते (वय २०) अशी या मायलेकींची नावे आहेत. या घटनेची नाेंद संकेस्वर पाेलिसात झाली आहे.

घटनास्थळासह पाेलिसाकडून मिळालेली आधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान श्रीदेवी ही शेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली होती. पाणी भरत असताना पाय घसरुन ती विहिरीत पडली. मुलगी पाणी घेऊन लवकर न आल्याने पहाण्यासाठी आई भारतीदेखील विहिरीवर गेली. पण  मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवणेसाठी आईने विहिरीत उडी घेतली. यामध्ये दाेघींचाही बुडून मृत्यू झाला.

श्रीदेवी ही निडसाेशीच्या पाॅलिटेक्निक महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत हाेती. दाेनच वर्षापूर्वी तिच्या वडिलाचे निधन झाले हाेते. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com