सीमापार अडकलेल्या मुलासाठी आईचा आटापिटा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - आभासी जगात झालेली ओळख... ओळखीतून प्रेमाची अनुभूती... त्यानंतर प्रेयसीचे कुटुंबीयांकडून जबरदस्तीने लग्न ठरविल्याने प्रियकर निराशेतून सीमापार आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात जातो. मात्र तिथे पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडून त्याची रवानगी तुरुंगात होते.

एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभावी अशी गोष्ट असली, तरी ही खरी घटना आहे. हमीद अन्सारी (31) या मुंबईतील अभियंत्याची! हमीदची एका पाकिस्तानी युवतीशी ऑनलाइन ओळख झाली होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र पाकिस्तानी प्रेयसीचे तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर हमीदने निराशेतून पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानातून सीमापार तो पाकिस्तानात पोचला. मात्र त्या वेळी तो पाकिस्तानी सैन्यांच्या तावडीत सापडला. घुसखोरीबद्दल पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने हमीदला तीन वर्षांचा कारावास सुनावला होता.

या घटनेनंतर 10 नोव्हेंबर 2012 रोजी हमीदचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले असल्याचे आई फौजिया अन्सारी यांनी सांगितले. त्या वेळी हमीदने 12 नोव्हेंबरला भारतात परत येणार असल्याचे सांगितले होते, मात्र चार वर्षांनंतर अद्याप तो परतला नसल्याचे फौजिया यांनी सांगितले. फौजिया या मुंबई येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.

याबाबत फौजिया यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहिले होते. मुलगा हमीद हा तुरुंगात असेल, तर याच्यासोबत बोलण्याची मुभा द्यावी. गेल्या चार वर्षांपासून मुलाचा आवाज ऐकला नसल्याचे फौजिया यांनी शरीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. याचसोबत त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची पाच वेळा भेट घेतली. आजारी असतानाही स्वराज यांनी ओळखल्याचे फौजिया म्हणाल्या.
इतकेच नव्हे तर पेशावर न्यायालयात हिबस कॉर्पस अर्थात कैद्याला प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी करणारी याचिका फौजिया यांनी दाखल केली होती. त्या वेळी हमीद लष्करी कोठडीत असल्याचे कारण देण्यात आले होते.

मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बेपत्ता
हमीदला तीन वर्षांची लष्करी कोठडी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली की नाही याबाबत निश्‍चितता नाही. तसेच हमीदला मदत करणाऱ्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या झीनत शेहझादी यांनाही स्थानिक संघटनांकडून लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याचेही फौजिया यांनी सांगितले.

Web Title: Mother wants her son