गायीच्या पोटावरील 'आईच्या कुशीत बाळ' व्हायरल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आई आपल्या बाळाला जशी जवळ घेते, अगदी तशी आकृती गायीच्या पोटावर उमटली आहे. गायीच्या पोटावरील आईच्या कुशीतील बाळाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

पुणेः आई आपल्या बाळाला जशी जवळ घेते, अगदी तशी आकृती गायीच्या पोटावर उमटली आहे. गायीच्या पोटावरील आईच्या कुशीतील बाळाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असेलेले फेसबुक व व्हॉट्सऍपवरून छायाचित्र व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित गाय ही बेळवाग जिल्ह्यातील देसाई इंगळी या गावातील शेतकरी राहुल जाधव यांच्या गोठ्यात आहे. गायीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. गायीच्या शरीरावरील ममतेची उमटलेली आकृती पाहून अनेकजण भारावून जात आहेत. अनेकजण गायीसोबतची छायाचित्रे व्हायरल करत आहेत.

, आईच्या कुशीत बाळ, गायीच्या पोटावर मातेचे दर्शन!, आईच्या कुशीत बाळ, गायीच्या पोटावर मातेचे दर्शन!

, आईच्या कुशीत बाळ, गायीच्या पोटावर मातेचे दर्शन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mothers appearance on cows belly photo viral