
Mother's Day 2023 : यंदा मदर्स डे ला आईची छाती गर्वानं फुलेल, तिला पाठवा या खास शुभेच्छा
Mother's Day 2023 : आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा शब्दांचा पवित्र मेळ घालत तयार झालेला शब्द आई. केवळ शब्दच नाही तर जगाची निर्माती आणि जगाची कायमस्वरूपी गरज अशी दयाळू, मायाळू आई. मग मदर्स डेला अशा आपल्या आईला तिची छाती गर्वाने फुलेल अशा काही शुभेच्छा पाठवायलाच हव्यात. चला तर मग पाठवा तुमच्या आईला या हटके शुभेच्छा.
1) स्वार्थ अन् निस्वार्थ यातला तंतोतंत अर्थ ओळखणारी जगाची जननी तू
आम्ही कधी आई तर कधी मम्मी म्हणतो आमची प्रेमळ जननी तू
न कधी तू तुझी चिंता दाखवलीस ना कधी आम्हास कशाची कमतरता भासवलीस
कायम असावी आमच्या पाठीशी तुझ्या मायेची सावली
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2) तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!
मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3) ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
4) तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Mothers Day)
5) न तुझ्यासारखी कोणी तू आहेस खास जगी
खास तुझे स्थान आई आहे आमच्या मनी
दिव्याच्या ज्योतीसारखी आहेस तू आई
लेकरांच्या सुखासाठी उन्हात अंग भाजती
आम्हाला रोज देते पूर्ण चपाती
स्वत: जगते आमच्यासाठी अर्धा दिवस उपाशी
थोर तुझी पुण्याई, भाग्य आमचे लाभली आम्हास अशी आई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Quotes)