घरात डांबून ठेवल्याने आईचा भूकबळी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश)- मुलाने घरात डांबून ठेवलेल्या वृद्धेचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी सोमवारी व्यक्त केला. रेल्वे कॉलनीतील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे रविवारी (ता. 9) केली होती.

त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर 80 वर्षांची वृद्धा मृतावस्थेत आढळली. तिचा मुलगा सलिल चौधरी हे रेल्वेत तिकीट तपासणीस आहेत. रेल्वे कॉलनीत त्यांना घर मिळाले आहे. वृद्धेचा मृतदेह आढळल्यापासून ते बेपत्ता झाले आहेत.

चौधरी यांनी आईला घरात डांबून ठेवले होते. भुकेमुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. कामावर न सांगता गैरहजर राहिल्याने त्यांना यापूर्वी दोन वेळा निलंबित करण्यात आले होते, असे शहाजहानपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर ओम शिव अवस्थी यांनी सांगितले. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी दिली.

Web Title: Mothers Death Due to keeping her in the house