बिहारमध्ये मोटार अपघातात 

पीटीआय
सोमवार, 14 मे 2018

राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा विवाहसोहळा आटोपून गावाकडे परतणारी एक मोटार रविवारी पहाटे दुर्घटनाग्रस्त झाली. यात किशनगंज राजदचे जिल्हाध्यक्ष इंतखाब आलम यांच्यासह चार जण जागीच ठार झाले. अन्य मृतांत राजद नेते इक्राम उल हक बागी, पप्पू आणि स्कॉर्पिओ चालक साहिल यांचा समावेश आहे. 

पाटणा - राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा विवाहसोहळा आटोपून गावाकडे परतणारी एक मोटार रविवारी पहाटे दुर्घटनाग्रस्त झाली. यात किशनगंज राजदचे जिल्हाध्यक्ष इंतखाब आलम यांच्यासह चार जण जागीच ठार झाले. अन्य मृतांत राजद नेते इक्राम उल हक बागी, पप्पू आणि स्कॉर्पिओ चालक साहिल यांचा समावेश आहे. 

इंतखाब आलम यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री होते. तसेच इक्राम उल हक बागी यांचे वडील इस्लामुद्दीन बागी हे बिहार सरकारमध्ये समाज कल्याणमंत्री होते. काल रात्री विवाहसोहळा आटोपल्यानंतर आज पहाटे स्कॉर्पिओ गाडी फारबिसगंजमधील सरसी पुलाजवळ आली असता चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळून उलट्या दिशेने फरफटत गेली. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचे छत पूर्णपणे दबले गेले आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी पोचलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी गाडीवर असलेला जिल्हाध्यक्षाचा फलक आणि आधार कार्डच्या आधारे मृतांची ओळख पटवली. 

Web Title: Motor car crash in Bihar