esakal | 15 हजारांच्या दुचाकीला 23 हजारांचा दंड !
sakal

बोलून बातमी शोधा

15 हजारांच्या दुचाकीला 23 हजारांचा दंड !

देशातील नवीन वाहतूक नियमांनुसार एका दुचाकीस्वाराला तब्बल 23 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. 01 सप्टेंबरपासून वाहतूक नियम तोडणारांना अधिक दंड भरावा लागत आहे. नियम लागू करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंजाबमधील गुरुग्राममध्ये दुचाकीस्वाला याचा फटका बसला आहे.

15 हजारांच्या दुचाकीला 23 हजारांचा दंड !

sakal_logo
By
वृत्तसंस्था

गुरुग्राम -  देशातील नवीन वाहतूक नियमांनुसार एका दुचाकीस्वाराला तब्बल 23 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. 01 सप्टेंबरपासून वाहतूक नियम तोडणारांना अधिक दंड भरावा लागत आहे. नियम लागू करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंजाबमधील गुरुग्राममध्ये दुचाकीस्वाला याचा फटका बसला आहे.

काय आहेत नवे वाहतूक नियम वाचा सविस्तर...

गुरुग्रामधील दिनेश मदान या व्यक्तीकडे वाहतूक परवाना, विमा, नोंदणी प्रमाणपत्र नव्हतं, तसंच प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. याशिवाय विनाहेल्मेट दुचाकी चालवत असल्या कारणाने हा तब्बल 23 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.  

loading image
go to top