moved memorials of the martyrs soldier of 1971 war
moved memorials of the martyrs soldier of 1971 warsakal

१९७१ च्या युद्धातील हुतात्मा जवानांचे स्मृतिचिन्हही हलविले

राष्ट्रीय युद्ध स्मारकात केले स्थलांतर

नवी दिल्ली : इंडिया गेटवरील शहीद स्मारकावरील अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकात केल्यानंतर आता १९७१ च्या युद्धातील हुतात्मा जवानांचे स्मृतीचिन्ह असलेले अधोमुखी (इन्व्हर्टेड) रायफल आणि त्यावरील सैनिकी शिरस्त्राण (हेल्मेट) हे स्मारकही आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलविण्यात आले आहे. सशस्त्र दलांतर्फे आज एका समारंभामध्ये लष्करी इतमामात हुतात्मा सैनिकांचे स्मृती चिन्ह इंडिया गेट परिसरात असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील परम योद्धा स्थळ या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मरणोत्तर परमवीर चक्र विजेत्या योद्ध्यांचे स्मृतिस्थान असलेल्या परम योद्धा स्थळाच्या मधोमध अधोमुखी रायफल आणि हेल्मेट असलेले हे स्मृतीचिन्ह बसविण्यात आले आहे.

चिफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू द चेअरमन, चिफ्स ऑफ स्टाफ कमिटी एअर मार्शल बी. आर. कृष्ण आणि तिन्ही दलांचे समकक्ष वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रथम इंडिया गेटवरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर रायफल आणि हेल्मेट विशेष वाहनाने परम योद्धा स्थल या ठिकाणी नेण्यात आले. १९७१ च्या युद्धामध्ये प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सर्व स्मृती राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये एकाच ठिकाणी आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. याआधी, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याआधी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील ज्योतीमध्ये विलीनीकरणावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने या निर्णयावर सवाल उपस्थित करून केंद्र सरकारवर टीका केली होती. राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेट परिसरात ४० एकर क्षेत्रात उभारण्यात आले असून स्वातंत्र्यानंतरच्या सर्व युद्धामध्ये प्राणार्पण करणाऱ्या २६ हजार जवानांची नावे या युद्ध स्मारकात कोरण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com