गोव्यातील खाण अवलंबितांचे रामलिला मैदानावर आंदोलन

विलास ओहाळ
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर आज सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलनास प्रारंभ केला. गोवा खाण लोकमंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनासाठी शुक्रवारपासून गोव्यातून अवलंबित दिल्लीला रेल्वेद्वारे रवाना होत होते.

आजपासून संसदीय अधिवेशन सुरू असल्याने केंद्र सरकारचे आणि विरोधी पक्षातील खासदारांचे खाणीच्या प्रश्‍नावर लक्ष वेधण्यासाठी अवलंबितांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी गोवा खाण लोकमंचचे अध्यक्ष पुती गावकर यांनी सांगितले की, आत्तापर्यंत आम्ही सर्व पावले उचलून पाहिली पण खाणी सुरू होतील, अशी केवळ आश्‍वासने देण्यात आली. निश्‍चित केव्हा आणि कधी खाणी सुरू होतील, हे सांगितले गेले तरी त्याची पूर्तता झालेली नाही. केवळ एका कायद्यात दुरुस्ती केली तर खाणी सुरू होतील, पण केंद्र सरकारने वेळ काढू धोरण अवलंबिले आहे. 

पाच राज्यांतील विधानसभा निकालानंतर केंद्रातील भाजपा सरकारला जाग येईल, अशी आशा आहे. त्यामुळेच आम्ही दिल्लीत आमच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने सरकार डोळे उघडून पाहील या उद्देशाने आंदोलन सुरू केल्याचे गावकर म्हणाले.

Web Title: Movement of Goa's dependents on the Ramlila grounds