Ayodhya Verdict : आम्हाला 5 एकराची भीक नकोय, पक्षकारांनी निर्णय नाकारावा : ओवेसी

वृत्तसंस्था
Saturday, 9 November 2019

हैदराबाद : 'सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अंतिम आहे, पण अचूक नाही. सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेली 5 एकर जागा ही भीक म्हणून नको आहे. वक्फ बोर्डाच्या पक्षकारांनी ही जमिनी नाकारायला हवी,' असे एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. 

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्यांचा निकालही अंतिम आहे, मात्र हा निकाल अचूक नाही असे माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा यांनी यापूर्वी सांगितले आहे. अशाच प्रकारे हा निर्णयही अचूक नाही. आरएसएसला आपला देश हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, हा निर्णय म्हणजे त्याकडे केलेली वाटचाल आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेली 5 एकर जमीन ही भीक म्हणून नकोय. जर बाबरी मशीदीचा ढाचा कोसळलाच नसता, तर आजचा निकाल काय लागला असता, असा सवाल औवेसी यांनी यावेळी केला. 

मुस्लिम समाजाच संविधानावर विश्वास आहे, पण हा निकाल आमच्यासाठी असमाधानकारक आहे. हा निकाल बंधूभावाचे प्रतीक नसून हिंदू राष्ट्राकडे केलेली वाटचाल आहे. आम्हाला 5 एकराची भीक नकोय, मी एकट्याच्या जीवावावर उत्तर प्रदेशात मशीद बांधू शकतो, असे औवेसी यांनी यावेळी सांगितले. 

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

आजचा अयोध्येचा निकाल आम्हाला मान्य नसून, आम्ही यापुढे येणाऱ्या पिढ्यांनाही सांगेन की भाजप व काँग्रेसने मिळून 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद जमीनदोस्त केली. आरएसएसची ही कृत्ये आम्ही आमच्या वारसांना सांगू. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नसून सुन्नी वक्फ बोर्डाने 5 एकराचा हा निर्णय नाकारावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Asaduddin Owaisi unhappy with Ayodhya Verdict