सेल्फीचा आनंद काही क्षणाचा, एकही जण नाही जिवंत | mass suicide

bhopal mass suicide
bhopal mass suicideesakal

भोपाळ : या सेल्फीमध्ये (bhopal mass selfie) कुटुंबातील प्रत्येक जण आनंदात दिसतोय. मात्र याच सेल्फीचा (selfie) आनंद काही क्षणातच विरला. अचानक असं काही घडलं की सेल्फीत दिसणाऱ्या कुटुंबातील सदस्यांपैकी एकही सदस्य आता जिवंत राहिला नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (bhopal) हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली होती.

मृत्यूपूर्वी लेकीने काढला कुटुंबाचा सेल्फी, सुसाईड नोटमध्ये उल्लेख

भोपाळमध्ये राहणारे संजीव जोशी, त्यांची पत्नी अर्चना, आई नंदिनी, दोन मुली पूर्वी आणि ग्रीष्मा यांनी विष घेऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. कोल्ड ड्रिंकमधून विष घेण्यापूर्वी त्यांनी फॅमिली सेल्फी काढला होता. मृत्यूपूर्वी जोशी कुटुंबाने भिंत आणि कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात संपूर्ण कुटुंबाला नाईलाजाने हे पाऊल उचललावे लागत असल्याचा उल्लेख केला होता. तसेच आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याचंही म्हटलं होतं. कोणी छळ केला या कुटुंबाचा? कोणाला ठरवलं जबाबदार?

काय लिहलंय सुसाईड नोटमध्ये?

बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची नावं त्यांनी लिहिली होती. या सर्वांना त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. बबलीने आपला खूप छळ केल्याचं पत्नी अर्चना जोशी यांनी म्हटलं आहे. बबलीने आमच्या घराजवळ गोंधळ घातला. यावेळी उर्मिलाही सोबत होती. पैसे देण्यासाठी आमचा घर विक्रीचा करारही झाला होता. पण बबलीचा यावर विश्वास नव्हता. त्यांनी फोनवर मुली पूर्वी आणि ग्रीष्मा यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती, असं अर्चना यांनी लिहिलं होतं.

bhopal mass suicide
परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू : गृहमंत्री

दुर्दैवाने सेल्फीमधील एकही सदस्य जिवंत नाही

दुर्दैवाने आता या सेल्फीमधील एकही सदस्य जिवंत नाही. कर्जबाजारी मेकॅनिकने आपल्या दोन मुली, पत्नी आणि आईसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नात मेकॅनिकची एक मुलगी आणि त्याची आई या आजी-नातीचा त्याच वेळी मृत्यू झाला होता. आता एकामागून एक मेकॅनिक, त्याची पत्नी आणि दुसरी मुलगी यांचीही प्राणज्योत मालवली. या कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्रा आणि उंदरालाही विषही पाजले होते.

bhopal mass suicide
उद्धव ठाकरेंनी ममतांना भेट नाकारली, आदित्य ठाकरेंसोबत घेणार बैठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com