esakal | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश; मग काँग्रेसने...
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश; मग काँग्रेसने...

मध्य प्रदेशापासून दिल्लीपर्यंत काँग्रेसला हादरवून टाकणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज घेतला भाजपचा झेंडा हाती.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश; मग काँग्रेसने...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मध्य प्रदेशापासून दिल्लीपर्यंत काँग्रेसला हादरवून टाकणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडीनंतर अखेर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला.  

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता भाजपची शाल पांघरली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्योतिरादित्य यांचा पक्षप्रवेश झाला.ज्योतिरादित्य यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. 

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसकडून भावनिक ट्विट करण्यात आले. यामध्ये पक्ष सोडून जाण्याच्या निर्णयाबाबत टिप्पणी करण्यात आली आहे.