बोअरवेलमध्ये पडलेल्या 'त्या' मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

बोअरवेलसाठी खोदलेल्या शंभर फूट खोल खड्ड्यात पडलेल्या पाच वर्षाच्या बालकाला पुरेशा प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश मिळाले आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सेहोरे (मध्य प्रदेश) : बोअरवेलसाठी खोदलेल्या शंभर फूट खोल खड्ड्यात पडलेल्या पाच वर्षाच्या बालकाला पुरेशा प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश मिळाले आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सत्यम नावाचा मुलगा गुरुवारी शंभर फूट बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने त्याला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत त्याची प्रकृती खराब झाली होती. उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये 50 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या एक वर्षाच्या मुलाला लष्कराने केलेल्या सतरा तास केलेल्या चमत्कारित कारवाईत प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश मिळाले होते.

Web Title: MP: Five-year-old dies after being rescued from borewell