'त्याने' बाईकवरून नेला आईचा मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या महिलेवर तिकमगड रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे तिच्या मुलाने रुग्णवाहिकेची मागणी केली होती.

भोपाळ : रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवी घटना समोर आली आहे. आईचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने तिच्या मुलाने मृतदेह बाईकवरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. 

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेल्या महिलेवर तिकमगड रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे तिच्या मुलाने रुग्णवाहिकेची मागणी केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर तिच्या मुलाने तिचा मृतदेह बाईकवरून नेला.

दरम्यान, यापूर्वी मोहनगड येथे राहणारी महिला सर्पदंशाने मरण पावली होती. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तिचा मृतदेह नेण्यास नकार दिल्यानंतर तिच्या पतीने तिचा मृतदेह नेला होता. त्यानंतर ओडिशातील भवानीपटना येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह तब्बल 12 किमी पायी जात नेला होता. त्यानंतर आता ही घटना घडली. 

Web Title: MP man forced to carry dead mother on bike after hospital refuses hearse