Boyfriend killed Girlfriend: 'बाबू, आता स्वर्गात भेटू'; गर्लफ्रेंडला संपवलं अन् इन्स्टाग्रामवरून केली पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boyfriend killed Girlfriend

Boyfriend killed Girlfriend: 'बाबू, आता स्वर्गात भेटू'; गर्लफ्रेंडला संपवलं अन् इन्स्टाग्रामवरून केली पोस्ट

दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशभरात हाहाकार माजवला असताना, मध्य प्रदेश राज्यात आणखी एक भीषण हत्येची नोंद झाली आहे जिथे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून खून केला आहे. अभिजित पाटीहार नावाच्या आरोपीने तिच्या रक्ताने माखलेल्या शरीराचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर हा आरोपी 5 दिवसांपासून हा फरार आहे. विशेष बाब म्हणजे, तो दररोज इन्स्टाग्रामवरून व्हिडीओ पोस्ट करत पोलिसांना चॅलेंज करताना दिसतो आहे. मध्यप्रदेशातील पोलिसांसाठी आता एक वेगळेच आव्हान उभे आहे. मध्य प्रदेशच्या जबलपुरमधील एका रिसॉर्टमध्ये 25 वर्षीय तरूणीची प्रियकराने गळा कापून हत्या केली.

ही घटना एका आठवड्यापूर्वी घडली होती परंतु पोलिसांनी अद्याप अभिजित पाटीदारला अटक केलेली नाही, ज्याने 25 वर्षीय शिप्रा झरियाची हत्या केल्याचा दावा केला आहे. जबलपूर येथील मेखला रिसॉर्टमधील एका खोलीतून तिचा मृतदेह सापडला.

हेही वाचा: Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत

दुसर्‍या व्हायरल व्हिडिओमध्ये, अभिजितने स्वत:ची ओळख पटना येथील एक व्यापारी म्हणून दिली आहे. जिथे तो एक जितेंद्र कुमारला त्याचा व्यवसाय भागीदार आहे. पीडितेचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपही त्याने केला आहे. त्याने दावा केला की, पीडितेने भागीदाराकडुन 50 हजार रुपये उसने घेतले होते.

पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर करूनही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटत आहे. पोलिस या प्रकरणाबद्दल माहिती देताना म्हणाले की आम्ही सायबर क्राईम टीमला यासंबंधी सर्व तपशील घेतले आहेत. मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करणारी व्यक्ती ओळखीची व्यक्ती असू शकते किंवा ती आरोपी देखील असू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटीदारने केवळ हत्याच केली नाही, तर जबलपूरमधील अनेक व्यावसायिकांची लाखोंची फसवणूक देखील केली आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case: आरोपी आफताबची होणार नार्को टेस्ट; कोर्टानं दिली परवानगी

प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपी अभिजीत पाटीदार त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मध्य प्रदेश पोलिसांना आव्हान देतोय. याशिवाय आरोपीने त्याच्या मृत गर्लफ्रेंडसह आयडीसह अनेक पोस्टही शेअर केल्यात. हत्या केल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्याने सोशल मीडियावर लिहिले की, "माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबू, मला माफ कर... आपण आता स्वर्गात भेटू."