खिडकीबाहेर काढलं डोकं अन् झालं धडावेगळं...

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

भोपाळः बसमधून प्रवास करत असताना उलटी आल्यामुळे खिडकी बाहेर डोक काढल्यानंतर वीजेच्या खांबावर आदळल्याने शीर बाहेर व धड बसमध्ये असा विचित्र प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भोपाळः बसमधून प्रवास करत असताना उलटी आल्यामुळे खिडकी बाहेर डोक काढल्यानंतर वीजेच्या खांबावर आदळल्याने शीर बाहेर व धड बसमध्ये असा विचित्र प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आशा राणी (वय 55) नावाची महिला सटाणा जिल्ह्यातून पाटणा जिल्ह्यात प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांना मळमळल्यासारखे झाल्याने त्यांनी उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. मात्र, त्यांचे डोके रस्त्याच्याकडेला असणाऱ्या पथदिव्याच्या खांबाला जोरात आदळले. यावेळी आशा राणी यांचे शीर धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले. यावेळी महिलेचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर आशा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आशा या मूळच्या छत्तापूर जिल्ह्यातील रहिवाशी होत्या.'

चालकाला वेगाने गाडी चालवण्याचा तसेच रस्त्यावर चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे’, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कुंजीर यांनी दिली.

Web Title: MP womans head severed as she leans out of bus to vomit at bhopal