खासदारांना हवी होळीची अतिरिक्त सुटी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मार्च 2017

नवी दिल्ली: अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरवातीलाच होळीच्या निमित्ताने सुट्यांचे दिवस एका दिवसाने वाढवण्याची मागणी राज्यसभेतून समोर आली आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत अनेक पक्षनेत्यांनी, होळीनिमित्त एकाऐवजी दोन दिवस (ता. 13 व 14 मार्च) सुटी देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र, होळीनिमित्त मंगळवारी (ता. 14) संसदेला सुटी नसेल, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी नंतर जाहीर केले.

संसद अधिवेशनात सुट्या देण्यास किंवा ते लवकर गुंडाळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट विरोध असल्याचे वारंवार दिसून आले आहे. यापूर्वी एका अधिवेशनात भाजप खासदारांनीच कामकाज गुंडाळण्याची मागणी केली, तेव्हा मोदी यांनी तत्कालीन संसदीय मंत्री वेंकय्या नायडू यांना, एक दिवस नव्हे तर एक तासभरही कामकाज कमी करू नका, असे बजावले होते. त्यानंतर भाजप खासदारांनी अशी कुजबूज करण्याची हिंमत केलेली नाही. मात्र, राज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात आहे, तेथे सरकारचे अनेक बाबतीत चालत नाही. आज झालेल्या बैठकीत होळीनिमित्त एक दिवस अतिरिक्त सुटी देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामागे काही नेत्यांनी दिलेले कारणही मजेशीर आहे. या नेत्यांच्या म्हणण्यानुसार होळीला रंग खेळल्यावर तो अंगावरून पूर्ण जाण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. यामुळे कामकाज ता. 13 बरोबरच 14 मार्चलाही बंद ठेवावे. सूत्रांनी सांगितले, की ही मागणी व त्यामागील कारण ऐकून सभापती हमीद अन्सारी यांच्या चेहऱ्यावर हतबद्ध झाल्याचे भाव उमटले होते.

फोटो बदलला !
अण्णा द्रमुकचे खासदार खिशात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता ऊर्फ अम्मा यांचा फोटो आवर्जून जवळ बाळगतात. अनेक जण तो फोटो दिसेल अशा पद्धतीने वागवतात व टेबलावरही ठेवतात. मात्र, या अधिवेशनात जाणवलेला ठळक बदल म्हणजे अनेक खासदारांच्या खिशात अम्मांऐवजी चिन्नम्मा म्हणजे शशिकला यांचा फोटो दिसत आहे.

Web Title: MPs want additional Holi holidays