सावरकरांचा इतिहास आता 'जेएनयू'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 August 2019

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच डाव्या विचारसरणी मानणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत असते. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'मृत्युंजय' या नाटकाच्या होणाऱ्या प्रयोगामुळे चर्चेत आलं आहे.

नवी दिल्ली : डाव्या विचारसरणीच्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू म्हणजेच जेएनयू विद्यापीठामध्ये सातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित 'मृत्युंजय' हे नाटक सादर होणार आहे. हे नाटक 13 ऑगस्टला सादर होणार असून याची संपूर्ण तयारी झाली आहे. जेएनयूनंतर देशभरातील इतर विद्यापीठांमध्ये देखील या नाटकाचे प्रयोग करून सावरकरांचे विचार देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच डाव्या विचारसरणी मानणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत असते. आता हे विद्यापीठ पुन्हा एकदा सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'मृत्युंजय' या नाटकाच्या होणाऱ्या प्रयोगामुळे चर्चेत आलं आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या नाटकाचे लेखक दिग्ददर्शन केले आहे. या आधी मार्च महिन्यात 'मृत्यूंजय' या नाटकाचा प्रयोग जेएनयुमध्ये दाखवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या प्रयोगाला विरोध झाला होता. आता पुन्हा या नाटकाचा प्रयोग जेएनयुमध्ये दाखवण्यात येणार आहे.

विद्यापिठामध्ये यंदा नवीन 3000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या नाटकाचा प्रयोग दाखवण्यात येणार आहे. तसेच जेएनयुमध्येच नाही तर देशभर या नाटकाचा प्रयोग दाखवून सावरकांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या नाटाकाचा प्रयोग हा विनामूल्य पाहता येणार आहे. 12 तारखेला दिल्ली विद्यापीठ आणि 13 ऑगस्टला जेएनयुमध्ये या नाटकाचा प्रयोग दाखवण्यात येणार असून, त्यानंतर उत्तरप्रदेश, बिहारसह देशभरातील विविध विद्यापीठात या नाटकाचे प्रयोग दाखवण्यात येणार आहेत.

दरम्यान या नाटकाच्या प्रयोगाला जेएनयुच्या प्राध्यापकांकडून देखील परवानगी मिळाल्याचे सावरकर स्मारकाचे प्रमुख कार्यवाहक राजेंद्र वराडकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrutyunjay dram will be play at JNU on Vinayak Damodar Savarkar