गंभीर, धोनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघे आगामी 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंभीर दिल्लीतून तर धोनी झारखंडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघे आगामी 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून ते निवडणूक लढवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. गंभीर दिल्लीतून तर धोनी झारखंडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरचे नाव यापूर्वीच भाजपासोबत चर्चेत होते. मात्र, भाजप दिल्लीच्या खासदार मिनाक्षी लेखी यांना हटवून गंभीरला संधी देण्यात येऊ शकते अशी चर्चा भाजपच्या गोटात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिनाक्षी लेखी यांच्या कामावर तसेच त्यांच्या पक्ष नेतेपदावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार म्हणून दिल्लीतील मतदारसंघातून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. मात्र, याच जागेसाठी गौतम गंभीर हा भाजपासाठी सर्वाधिक चर्चेत राहणारा उमेदवार ठरेल.

त्याचबरोबर, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशीही भाजपाची बोलणी सुरु आहे. याद्वारे भाजप या दोन्ही स्टार खेळाडूंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण देशभरात त्यांना घेऊन भाजप प्रचार मोहिमा राबवू शकते. हे दोघेही त्यांच्या राज्यांपुरतेच नव्हे तर देशाचेही प्रतिनिधित्व करतात. दोघांचेही चाहते देशभरात मोठ्या प्रमाणावर आहेत.

Web Title: MS Dhoni, Gautam Gambhir likely to contest on BJP ticket in 2019 Lok Sabha elections