धोनीचे 3 मोबाईल चोरीला; तक्रार दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

धोनीने याविषयी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आगीनंतर मला सुरक्षित बाहेर नेण्यात आले. पण, माझे मोबाईल तेथेच राहिले. या मोबाईलमध्ये भारतीय संघ व बीसीसीआयबाबत काही माहिती आहे. पोलिस मोबाईलचा शोध घेत आहेत.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे दिल्लीतील हॉटेलमधून 3 मोबाईल चोरीला गेले आहेत. याप्रकरणी त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सध्या झारखंड संघाचे नेतृत्व करत असलेला धोनी विजय हजारे करंडकातील सामना खेळण्यासाठी द्वारका सेक्टरमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. शुक्रवारी या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर त्याचे तीन मोबाईल चोरीला गेले आहेत. आगीनंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढले होते.

धोनीने याविषयी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आगीनंतर मला सुरक्षित बाहेर नेण्यात आले. पण, माझे मोबाईल तेथेच राहिले. या मोबाईलमध्ये भारतीय संघ व बीसीसीआयबाबत काही माहिती आहे. पोलिस मोबाईलचा शोध घेत आहेत.

दरम्यान, एक दिवस पुढे ढकलण्यात आलेला झारखंड व बंगाल यांच्यातील सामन्यात झारखंडला बंगालचे आव्हान पेलवता आले नाही. त्यामुळे विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्यांचे आव्हान संपुष्टात आले. श्रीवत्स गोस्वामी आणि अभिमन्यू इस्वरन यांच्या शतकांमुळे बंगालने प्रथम फलंदाजी करताना 329 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानासमोर झारखंडचा डाव 288 धावांवर संपुष्टात आला.

Web Title: ms dhonis three mobile phones stolen in delhi