म्युकरमायकोसिस कोरोनापेक्षा धोकादायक, मृत्यूदर 46 टक्के

mucormycosis
mucormycosise sakal

देशात दररोज म्युकरमायकोसिस रुग्णांच संख्या वाढतच आहे. आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर म्युकरमायकोसिसचं संकट आलं आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र, म्युकरमायकोसिसचं नवीन संकट उभं राहिलं आहे. एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 46 टक्के इतका आहे. गतवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर यादरम्यान देशातील 16 सेंटरवर म्युकरमायकोसिस रुग्णांवर संशोन करम्यात आलं. तीन महिन्यातील उपचारादरम्यान म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण तब्बल 46 टक्के असल्याचं समोर आलं. यामध्ये गुजरातमधील चार सेंटरचा समावेश आहे.

'मल्टीसेंटर अॅपिडेमियोलॉजिकल स्टडी ऑफ कोरोनाव्हायरस डिजीज-एसोसिएटेड म्यूकोर्मिकोसिस, इंडिया' या शीर्षकाखाली नुकतीच या संशोधनाला प्रतिष्ठित अशा सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आलं होतं. या अभ्यासात देशभरातील 16 सेंटरमधील 287 रुग्णांचा समावेश होता. यामध्ये अहमदाबाद आणि सूरतमधील प्रत्येकी एका एका रुग्णालयाचा समावेश होता. तसेच दिल्ली आणि भोपाळच्या एम्स रुग्णालयाचाही समावेश होता. दिल्लीतील खासगी रुग्णालय सर गंगा राम अस्पताल आणि मेदांता रुग्णालयाचा समावेश होता. मुंबईतील केडीएएच या सेंटरची स्टडीसाठी निवड करण्यात आली होती.

mucormycosis
HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

या अभ्यासात असं समोर आलं की, 287 रुग्णांपैकी 187 (65%) जणांना कोरोनाच्या संबधित म्युकरमायकोसिस प्रकारात मोडलं होतं. वरील केंद्रामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली होती. याची सख्या 112 वरुन 231 इतकी झाली होती. म्युकरमायकोसिस रुग्णांचं सरासरी वय 53 वर्ष असल्याचं अभ्यासात दिसून आलं. यामधील 75 टक्के रुग्ण पुरुष होते. तर 33 टक्केंपेक्षा जास्त जणांना डायबेटिसचाही आजार होता. तर 21 टक्के रुग्णांना कोरोना संक्रमणानंतर डायबेटिसची लक्षणं दिसून आली.

mucormycosis
लस घेतल्यानंतर मास्क घालावा का? PIB नं दिलं उत्तर

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि या संशोधनाचे सहलेखक डॉ अतुल पटेल यांनी सांगितलं की, म्युकरमायकोसिस रुग्णाचा मृत्यूदर सहा आठवड्यात 38 टक्के असल्याचं अभ्यासात समोर आलं. तर 12 आठवड्याच्या उपचारानंतर म्युकरमायकोसिस रुग्णाचा मृत्यूदर 46 टक्के झाला. मृत्यूदरचं प्रमुख कारण म्हणजे वय, रायनो-ऑर्बिटल सेरेब्रल इन्वॉल्वमेंट आणि जास्तवेळ आयसीमध्ये राहणं हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com