मुघलसरायला अखेर उपाध्याय यांचे नाव 

पीटीआय
बुधवार, 6 जून 2018

रेल्वेच्या मुघलसराय जंक्‍शन आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते दीनदयाळ उपाध्याय जंक्‍शन या नावाने ओळखले जाईल. या नामकरणाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना कालच जारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्‍त्याने दिली.
 

लखनौ - रेल्वेच्या मुघलसराय जंक्‍शन आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते दीनदयाळ उपाध्याय जंक्‍शन या नावाने ओळखले जाईल. या नामकरणाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना कालच जारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्‍त्याने दिली.

चांदौली जिल्ह्यातील या जंक्‍शनचे नामकरण दीनदयाळ उपाध्याय असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या जूनमध्ये केला होता. नंतर हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे गेला आणि काल राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. मुघलसराय हे दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जन्मस्थान आहे. 

Web Title: Mughalsarai station becomes Deen Dayal Upadhyaya now