श्रीमंत भारतीयाचा मान पुन्हा अंबानींना ; फोर्ब्सची यादी जाहीर

Ambani become Richest Indians Forbes list released
Ambani become Richest Indians Forbes list released

नवी दिल्ली : फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलर असून, चालू वर्षात त्यामध्ये 9.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. अंबानी यांच्यापाठोपाठ "विप्रो'चे चेअरमन अझिम प्रेमजी यांनीही आपले दुसरे स्थान कायम राखले असून, त्यांची एकूण संपत्ती 21 अब्ज डॉलर इतकी आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 2 अब्ज डॉलरने वाढ झाली. 

"अर्सेलर मित्तल'चे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत तिसऱ्या स्थानी असून, त्यांची एकूण संपत्ती 18.3 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यात चालू वर्षात 1.8 अब्ज डॉलरने वाढ झाली. मित्तल यांच्यापाठोपाठ हिंदूजा ब्रदर्स आणि पालनजी मिस्त्री हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती अनुक्रमे 18 व 15.7 अब्ज इतकी असल्याची माहिती फोर्ब्सने दिली. 

'टॉप 10' मध्ये यांचा समावेश 

- शिव नाडर (14.6) 
- गोदरेज कुटुंब (14) 
- दिलीप संघवी (12.6) 
- कुमार बिर्ला (12.5) 
- गौतम अदाणी (11.9) 
(एकूण मालमत्ता अब्ज डॉलरमध्ये) 

मजुमदार यांची मोठी झेप 

फोर्ब्सच्या यादीत चार महिलांचा समावेश असून, त्यापैकी एक असलेल्या बायोकॉन लिमिटेडच्या चेअरमन किरण मजुमदार यांच्या संपत्तीत (66.5 टक्के) सर्वाधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. 3.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह त्या 39 व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी 72 क्रमांकावर होत्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com