2030 पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असेल भारताची: मुकेश अंबानी

Mukesh Ambani
Mukesh AmbaniFile Photo

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये (AED) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Mabani) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वाचं विधान केले आहे. मुकेश अंबनी यांनी (Mukesh Ambani) आज बुधवारी असा दावा केलाय की, भारत लवकरच जपानला मागे टाकेल. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की, 2030 पर्यंत भारत जपानला जीडीपीच्या (Japan GDP) संदर्भात मागे टाकेल. यासोबतच भारत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था (Largest Economy) बनेल.

Mukesh Ambani
Nawab Malik | ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटरचा कार्यक्रम आशिया इकॉनॉमिक डॉयलॉग 2022 (Asia Economic Dialogue) मधील एका चर्चेत भाग घेतला होता. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, येणाऱ्या काळात भारत आणि आशियाची काय परिस्थिती असणार आहे? तेंव्हा त्याचं उत्तर देताना मुकेश अंबाजनी यांनी म्हटलं की, आशियाने गेल्या दोन शतकांपासून खूपच वाईट काळ पाहिला आहे. आता आशियाची वेळ आली आहे आणि 21 वं शतक आशियाचे असेल. ग्लोबल इकॉनॉमीचे (Global Economy) सेंटर आता आशियामध्ये शिफ्ट झालं आहे. आशियाची जीडीपी (Asia GDP) ही इतर जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त झाला आहे.

Mukesh Ambani
अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांचा संप मागे

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताचा जीडीपी 2030 पर्यंत जपानपेक्षाही मोठा होईल. यासोबतच भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीनची ग्रोथ स्टोरी जितकी शानदार आहे, तितकीच शानदार भारताची असेल. त्यांनी यासाठी तीन टार्गेट देखील सेट केले आहेत. अंबानींनी म्हटलंय की, भारताने तीन गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. सर्वांत आधी भारताला 10 टक्क्यांहून अधिक ग्रोथ रेटसाठी एनर्जी आऊटपूट वाढवायला हवं. त्यांनी दुसरं काम सांगितलं की, भारताला एनर्जी बास्केटमध्ये क्लीन अँड ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढवायला हवेत. तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे आत्मनिर्भर बनायला हवं. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की पुढील 10-15 वर्षांत भारताची कोळशावरील अवलंबित्व समाप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com