"जिओ' आता मोफत नाही: मुकेश अंबानी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

देशभरात कोणत्याही नेटवर्कला केला गेलेला व्हॉईस कॉल हा मोफत असेल. सध्या जिओ वापरत असलेल्या वा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेणाऱ्या ग्राहकांना 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल...

मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी यांनी भविष्यात जिओ नेटवर्कसहित किफायतशीर दरात जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण माहिती (डेटा) उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले.

अंबानी म्हणाले -

  • जिकडे सध्या देशभरातील सर्व ऑपरेटर्सच्या एकंदर क्षमतेपेक्षा जास्त '4 जी बेस स्टेशन्स' आहेत. येत्या काही महिन्यांत ही संख्या दुप्पट करण्याची आमची योजना आहे.
  • देशभरातील इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेमध्ये जिओ नेटवर्ककडून 20% डेटा जास्त पुरविला जाईल
  • देशभरात कोणत्याही नेटवर्कला केला गेलेला व्हॉईस कॉल हा मोफत असेल. याचबरोबर या कॉल्ससाठी कोणताही कोणत्याही स्वरुपाचे "रोमिंग, हिडन' चार्जेस वा "ब्लॅकआऊट डेज'असणार नाहीत.
  • 2017 च्या अखेरपर्यंत जिओ नेटवर्क हे देशामधील सर्व गावे, शहरांमध्ये उपलब्ध असेल. देशातील 99% नागरिकांस जिओ नेटवर्कचे कव्हरेज आम्ही पुरवू
  • जिओ नेटवर्कच्या ग्राहकांनी विक्रम केले आहेत! प्रत्येक दिवशी जिओ युजर्सकडून 200 कोटी मिनिटांपेक्षा जास्त "व्हॉईस व व्हिडिओ' कॉल्स केले जातात. जिओच्या उदयापूर्वी भारत ब्रॉडबॅंड माअध्यमामधून वापरण्यात येत असलेल्या डेटासंदर्भातील यादीमध्ये 150 व्या स्थानावर होता.
  • गेल्या 170 दिवसांत प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक सेकंदास जिओ नेटवर्कमध्ये सात ग्राहकांची भर पडली आहे. या 170 दिवसांत जिओ नेटवर्क युजर्सची संख्या 10 कोटींपलीकडे जाऊन पोहोचली आहे. एअरटेल कंपनीस हा टप्पा गाठण्यास तब्बल तीन वर्षे लागली; तर व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांस 10 कोटी युजर्स मिळविण्यासाठी 13 वर्षे लागली.

जिओ नेटवर्कचा दर हा आता असा असेल -

  • सध्या जिओ वापरत असलेल्या वा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेणाऱ्या ग्राहकांना 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल.
  • या सदस्यात्वान्वये आणखी एका वर्षासाठी जिओची मोफत 4 जी डेटा सर्व्हिस मिळेल.
  • जिओच्या सदस्यत्वासाठीची नोंदणी 1 मार्च ते 31 मार्च या काळात करता येईल. पुढील वर्षापर्यंत (31 मार्च, 2018) या सदस्यत्वाची मुदत असेल.
Web Title: Mukesh Ambani says Jio won't be free after March 31