'राहुल गांधी 'पप्पू' नव्हे तर 'गप्पू'

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राहुल गांधींनी योग्य म्हटले होते, की आता ते 'पप्पू' राहिले नाहीत. आता ते 'पप्पू'पासून 'गप्पू' झाले आहेत. तसेच पप्पूपासून ते गप्पूपर्यंतचा त्यांचा प्रवास खोटं बोलण्याच्या आधारे सुरू झाला आहे, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज (शनिवार) खिल्ली उडवली. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांच्या प्रचारसभांदरम्यान विरोधकांकडून राहुल गांधींना 'पप्पू' म्हणून खिल्ली उडवण्यात येत होती. मात्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर आता राहुल गांधी आता 'पप्पू' राहिले नाहीत, असे लोक बोलू लागली आहेत. त्यावर नक्वी म्हणाले, की राहुल गांधी 'पप्पू'हून आता 'गप्पू' झाले आहेत. 'पप्पू'पासून ते 'गप्पू'पर्यंतचा त्यांचा प्रवास खोटं बोलण्याच्या आधारे सुरू झाला आहे. तर ते बरोबर बोलत आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधी आता पप्पू नाहीतर 'परमपूज्य' झाले आहेत, असे काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. त्यानंतर आता नक्वी यांनी हे विधान केले आहे.

Web Title: Mukhtar Abbas Naqvi Criticizes Congress President Rahul Gandhi