Mukhtar Ansari : स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मलेला पोरगा बाहुबली कसा बनला? जाणून घ्या माफिया मुख्तार अंन्सारीबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mukhtar ansari

Mukhtar Ansari : स्वातंत्र्यसैनिकांच्या घरात जन्मलेला पोरगा बाहुबली कसा बनला? जाणून घ्या माफिया मुख्तार अंन्सारीबद्दल

वाराणसीच्या एमपीएमएलए कोर्टाने अवधेश राय मर्डर प्रकरणी माफिया तसेच माजी आमदार मुख्तार अंन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी कोर्टाने शिक्षा सुनावताना जन्मठेपेसह १लाख २० हजारांचा दंडही ठोठावला.

हे संपूर्ण प्रकरण ३२ वर्षांपूर्वीचे असून यामध्ये तो दोषी आढळला असता तर अन्सारीला फाशीची शिक्षा होऊ शकली असती. खटल्याच्या सुनावणीनंतर कोर्टात सुरक्षा वाढवण्यात आली होती. गेल्या वर्षभरात मुख्तार अंन्सारीला चार प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. मात्र या सर्व प्रकरणात अवधेश राय हत्याकांड महत्त्वाचा मानले जात होते कारण दोषी आढळल्यास मुख्तार अन्सारीला फाशीची शिक्षा होऊ शकली असती. मुख्तार अंन्सारीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू शकतो.

अवधेश राय हत्या प्रकरण काय आहे?

ही घटना १९९१ ची आहे, जेव्हा अवधेश राय यांची ३ ऑगस्ट १९९१ रोजी वाराणसीतील लहुराबीर येथे त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. सशस्त्र हल्लेखोरांनी अवधेश राय यांना गोळ्या घातल्या. व्हॅनमधील हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या केला. घटनेच्या वेळी लहान भाऊ अजय रायही तिथे होता. ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्यापासून हाकेच्या अंतरावर चेतगंज पोलीस ठाणे आहे.

अवधेश राय यांचा भाऊ आणि काँग्रेस नेते अजय राय यांनी मुख्तार अन्सारी आणि माजी आमदार अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह आणि राकेश यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवले होते. मुख्तार अन्सारीला सोमवारी वाराणसीच्या एमपीएमएल कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. उर्वरित चार आरोपींचा खटला प्रयागराज न्यायालयात सुरू आहे.

केस डायरीच झाली होती गायब

या प्रकरणातील मजेशीर बाब म्हणजे जून २०२२ मध्ये या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मूळ केस डायरीच गायब असल्याचे आढळून आले. यानंतर वाराणसी ते प्रयागराजपर्यंत केस डायरी शोधण्यात आली मात्र मूळ केस डायरी सापडली नाही. मुख्तार अंन्सारी याने मूळ केस डायरी गायब करण्यात आपलं वजन वापरल्याचं बोललं जात आहे.

कोण आहे मुख्तार अंन्सारी

मुख्तार अंन्सारीचा जन्म गाजीपुर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे ३ जून १९६३ साली झाली. वडिलांचे नाव सुबहानउल्लाह अन्सारी आणि आईचे नाव राबिया होतं. गाजीपूर जिल्ह्यात अन्सारी कुटुंबाचा राजकीय क्षेत्रात चांगला दबदबा होता.

हे कुटुंब प्रतिष्ठीत समजलं जात होतं. १७ वर्षांपासून तुरुंहात बंद असलेल्या मुख्तार अन्सारीचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत काम करत १९२६-२७ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

मुख्तार अंन्सारीचे आईचे वडील ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे १९४७ च्या लढाईत शहिद झाले आणि त्यांना महावीर चक्र देऊन गौरव करण्यात आला होता. मुख्तारचे वडील सुबानउल्लाह अन्सारी हे राजकारणात सक्रिय होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी नात्याने मुख्तार अन्सारीचे चुलते लागतात.