मुलायमसिंहांकडून राष्ट्रीय अधिवेशन रद्द

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

आज सपचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी ट्विटरवर मुलायमसिंह यांनी हे अधिवेशन रद्द केल्याचे सांगितले. दरम्यान आज सकाळी अकरा वाजता अखिलेश यादव समाजवादी पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. 

लखनौ - समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी 5 जानेवारीला बोलविलेले पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच ते दिल्लीला रवाना झाले असून, समाजवादी पक्षातील कलह अद्याप सुरुच असल्याचे यावरून दिसून येते.

मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांनी रविवारी घेतलेले समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन मुलायमसिंह यादव यांनी बेकायदा असल्याचे जाहीर केले होते. हे तथाकथित अधिवेशन रामगोपाल यादव यांनी बोलावले असून ते पक्षाची घटना आणि शिस्तीच्याविरोधात आहे. पक्षाचे नुकसान घडवून आणण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात येत असल्याचे यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे त्यांनी पाच जानेवारीला राष्ट्रीय अधिवेशन बोलाविले होते.

आज सपचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी ट्विटरवर मुलायमसिंह यांनी हे अधिवेशन रद्द केल्याचे सांगितले. दरम्यान आज सकाळी अकरा वाजता अखिलेश यादव समाजवादी पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. 

मुलायमसिंह यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की मी आजारी नसून, माझी प्रकृती उत्तम आहे. माध्यमे माझ्यासोबत असल्याने मी त्यांचे आभार मानतो. मी प्रामाणिक माणूस असून, सर्वोच्च न्यायालयानेही मला निर्दोष मुक्त केलेले आहे. मी आज दिल्लीला जात आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही. 
 

Web Title: Mulayam calls off Samajwadi Party January 5 meet