नोटांवरील बंदी 1 आठवड्यासाठी मागे घ्या- मुलायमसिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

या निर्णयासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत, असेही मुलायमसिंह यांनी सांगितले. महिलांनी एक एक रुपया जमा करत घरगुती बचत केली आहे. त्यामुळे महिलांना पाच लाखांपर्यंत सूट देण्यात यावी, असे मुलायमसिंह म्हणाले.

नवी दिल्ली : पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे एक आठवड्यासाठी मागे घ्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केली आहे.

तत्पूर्वी, ही अप्रत्यक्ष आणीबाणी असल्याचे विधान करीत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. 
मुलायमसिंह म्हणाले, "जीवनावश्यक वस्तू मिळणेसुद्धा लोकांना दुरापास्त झाले आहे. बाजारपेठाही बंद आहेत. रुग्णांवरील उपचार बंद झाले आहेत आणि भाजपला निवडणुका दिसत आहेत." 

महिलांना आणखी सूट हवी
या निर्णयासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत, असेही मुलायमसिंह यांनी सांगितले. महिलांनी एक एक रुपया जमा करत घरगुती बचत केली आहे. त्यामुळे महिलांना पाच लाखांपर्यंत सूट देण्यात यावी, असे मुलायमसिंह म्हणाले.
 
Web Title: Mulayam Singh Yadav demands roll back of demonetisation