सपाला धक्का! अखिलेश यादवांच्या घरातच स्फोट?

UP Election: मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Aparna Yadav
Aparna YadavSakal

UP Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाला (Samajvadi Party) मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. नुकतेच तीन कॅबिनेट मंत्री आणि आठ आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु आता मात्र समाजवादी पक्षासाठी एक वाईट बातमी आहे.

मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची धाकटी सून अपर्णा यादव (Aparna Yadav) आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करू शकतात, अशी बातमी आहे. याची पुष्टी झाली नसली तरी सोशल मीडियावर त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

Aparna Yadav
यूपीमध्ये राजकीय घडामोडींना वेग; समाजवादी पक्ष आणि रालोद येणार एकत्र?

अपर्णा यांनी 2017 ची निवडणूक लखनऊ कँटमधून लढवली होती. भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र अपर्णा सातत्याने पीएम मोदी आणि सीएम योगी यांचे कौतुक करत होत्या.

सपा संस्थापक मुलायम सिंह यांचे जवळचे मित्र हरी ओम यादव यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा यादव यांनी 2017 ची निवडणूक लखनऊ कँट मतदारसंघातून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला.

Aparna Yadav
UP : भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा

आता भाजप अपर्णा यादव यांना लखनऊच्या कँट विधानसभेतून उमेदवार बनवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि अपर्णा यादव यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com