'सायकल'साठी मुलायमसिंहांची निवडणूक आयोगाकडे धाव

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात सुरू अंतर्गत कलहाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी पक्षाचे सायकल हे निवडणूक चिन्ह कायम राहावे यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव जाण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना यादव म्हणाले, "कोणीही माझ्यावर कसलेही आरोप केलेले नाहीत. मी कधीही काही चुकीचे काम केलेले नाही. माध्यमांनीही मला सदैव साथ दिलेली आहे. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांतून सर्वोच्च न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. मी संपूर्णपणे निरोगी आहे.' दरम्यान, पक्षाचे "सायकल' हे चिन्ह कायम राहावे यासाठी मुलायमसिंह यादव निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी अखिलेश यादव हे आपला पक्षच खरा समाजवादी पक्ष असल्याची दावाही आयोगासमोर करणार आहेत.

रविवारी समाजवादी पक्षात मोठ्या घडामोडी झाल्या. रविवारी सकाळी अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले. तर, समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शन बनविण्यात आले आहे.

Web Title: Mulayam to visit EC to stake claim to SP's 'cycle' symbol