जिद्दीला सलाम! बारावीत नापास होऊनही झाले आयपीएस

ManojKumar Sharma
ManojKumar Sharma

भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन गेले. होय, ही सत्य कहाणी आहे मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांची.

मनोजकुमार शर्मा यांच्या जिवनातील संघर्षाची कहाणी आता पुस्तकरुपात येत आहे. पुढील आठवड्यात मुंबईत मनोजकुमार यांच्यावरील '12th Fail' या पुस्तकाचे प्रकाशन होत असून, हे पुस्तक त्यांचे मित्र आणि उपायुक्त अनुराग पाठक यांनीच लिहिले आहे. कायम आपल्या ध्येयाचे लक्ष्य ठेवून काम करणाऱ्या मनोजकुमार यांच्या जीवनातील रंजक घडामोडी आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत.

उत्तर प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील असलेल्या मनोजकुमार यांना बारावीत अपयशाला सामोरे जावे लागले होते. पण, त्यांनी आपले लक्ष्य कायम ठेवताना त्यापर्यंत पोहचण्याची जिद्द दाखविली. या प्रवासाविषयी बोलताना मनोजकुमार म्हणाले, की परीक्षेत मिळणारे गुण हेच फक्त यश असते, असे नाही. दहावीची परीक्षा मी तिसऱ्या डिव्हिजनमधून आणि अकरावीची दुसऱ्या डिव्हिजनमधून उत्तीर्ण झालो. बारावीत मला अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर मी खचलो नाही. बारावीत पुन्हा उत्तीर्ण होऊन ग्वाल्हेर येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर पीएचडी पूर्ण केली. मगं मी यूपीएससीची तयारी सुरु केली. अखेर चौथ्या प्रयत्नात मला देशभरात 121 वी रँक मिळविण्यात यश आले. अपयशाचे कधीच आपल्या मनावर राज्य करू देऊ नका. 

या पुस्तकाचे लेखक अनुराग पाठक म्हणाले, की विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठीच मी हे पुस्तक आणत आहे. मनोज हे माझ्या पुस्तकाचे हिरो असून, या पुस्तकातून मी परीक्षेत नापास होऊनही यश मिळविलेल्या अन्य काही जणांची माहिती आपल्यापर्यंत पोचविणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com