Amruta Fadnavis Blackmail Case :अनिल जयसिंघानीचा फास आवळला; ED कडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis Blackmail Case

Amruta Fadnavis Blackmail Case: अनिल जयसिंघानीचा फास आवळला; ED कडून अटक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी सट्टेबाज अनिल जयसिंघानी याला इडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी याला अहमदाबाद युनिटने 10 हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली. जयसिंघानी हा 15 हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी असून सट्टेबाजीच्या प्रकरणात त्याला तीनदा अटक झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.