मुंबई हल्ल्याइतकाच नगरोटा हल्ला लाजिरवाणा - पी. चिदंबरम

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नगरोटा हल्ल्यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुंबईत ताज हॉटेलवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याइतकाच नगरोटा हल्ला लाजिरवाणा असल्याची टीका त्यांनी केली. तसेच "सर्जिकल स्ट्राइक'मुळे सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या "चॉइसेस : इनसाइड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. सध्या गृहमंत्रालयात एकवाक्‍यता नसल्याचा टोला त्यांनी या वेळी लगावला. मुंबईवर 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ल्याइतकाच नगरोटामधील लष्करी तळावर झालेला हल्लाही अत्यंत लाजिरवाणा होता. सीमेपलीकडून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राइकद्वारे रोखता येणार नाही, असे त्यांनी या वेळी नमूद केले. तुम्ही असं कराल तर आम्ही असं करू शकतो, असा वेगळाच संदेश सर्जिकल स्ट्राइकमुळे जातो, असेही ते म्हणाले. अशा कारवाईमुळे दहशतवाद संपवता येऊ शकत नाही, असे सांगत शेजारील देशाबरोबर "सर्जिकल स्ट्राइक'पेक्षा चर्चेनेच संबंध सुधारता येतील, असे सांगितले.

जम्मू-काश्‍मीरमधील नगरोटा येथील लष्कराच्या दोन तळांवर दहशतवाद्यांनी 30 नोव्हेंबर रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले होते. लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले होते. नगरोटा हे ठिकाण जम्मूपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. येथे 16 कॉर्प्सचे मुख्यालय आहे.

उरी येथील लष्करी तळावर 18 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्या वेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सुमारे 7 ते 8 तळ नष्ट केले होते. या कारवाईत 30 हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला होता.

Web Title: Mumbai attack same Nagrota shameful attack