मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी ताहिर मर्चंट पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. छातीत दुखू लागल्याने पहाटे तीन वाजता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. 

पुणे : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहिर मर्चंटचा आज (बुधवार) मृत्यू झाला. 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी ताहिर मर्चंट पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. छातीत दुखू लागल्याने पहाटे तीन वाजता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. 

1993 blast

ताहिर मर्चंट हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनचा सर्वात जवळचा साथीदार होता. ताहिर मर्चंट हा सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान पहाटे पावणेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती येरवडा कारागृह प्रशासनाने दिली. 

Web Title: Mumbai Bomb Blast Tahir Merchant dead during treatment