दानिश सिद्दीकींचा 'हा' फोटो ठरला 'पुलित्झर' पुरस्काराचा मानकरी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

दानिश हे मुंबईत आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करतात. फिचर फोटोग्राफी विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

मुंबई - पत्रकारितेतला नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार मुंबईचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना जाहीर झाला आहे. दानिश हे मुंबईत आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करतात. फिचर फोटोग्राफी विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दानिश यांनी रोहिंग्या निर्वासितांचे फोटो काढून त्यातून त्याचे जीवन जगासमोर मांडले आहे. त्यांनी दक्षिण आशिया, मध्यपूर्वेतले संकट, अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्ध, रोहिंग्या निर्वासितांचा मुद्दा, नेपाळमध्ये आलेला विनाशकारी भूकंप यांसारख्या अनेक महत्वाच्या घटनांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या क्षेत्रात जागतिक पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्यांना 1917 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. 

दानिश हे टी. व्ही. जर्नलिस्ट होते. त्यांनी एका प्रतिष्ठीत टी. व्ही. चॅनेलसाठी कामही केले आहे. ते 2010 मध्ये फोटो जर्नलिझम कडे वळले आणि रॉयटर्स मध्ये इंटर्न म्हणून रुजू झाले. फोर्ब्स इंडीयाला दिलेल्या मुलाखतीत दानिश यांनी हा फोटो घेण्यासाठीची कसरत सांगितली आहे. ज्या बीचवर हा फोटो घेतला आहे त्याचे नाव आहे शा पोरीर द्विप. हा बांग्लादेशचा शेवटचा आइसलँन्ड आहे. येथे 3 ते 4 तास वाट बघितल्यानंतर या फोटोत आलेले दृश्य टिपता आले होते, असे दानिशने मुलाखतीत सांगितले आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mumbai photojournalist Danish Siddiqui wins Pulitzer Award for series on Rohingya crisis