जगातील सर्वात जास्त गर्दीच्या 403 शहरांत मुंबईचा पहिला क्रमांक!

वृतसंस्था
बुधवार, 5 जून 2019

  • मुंबई हे जगातील सर्वात जास्त ट्रॅफीकचा भार पेलणारे शहर
  • लोकेशन टेक्नॉलॉजी कंपनी 'टॉमटॉम'ने तयार केला रिपोर्ट
  • दिल्लीचा लागतो चौथा क्रमांक

नवी दिल्ली : मुंबई हे जगातील सर्वात जास्त ट्रॅफीकचा भार पेलणारे शहर आहे. जगातील 56 देशातील 403 शहरातील ट्रॅफीक आणि गर्दी याआधारे तयार केल्या गेलेल्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.

मुंबईत गर्दीच्या वेळात लोकांना त्यांच्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी 65 टक्के पेक्षा जास्त वेळ लागतो. या यादीत 58 टक्के पेक्षा जास्त वेळ लागणारं शहर दिल्लीने चौथा क्रमांक लावला आहे. हा रिपोर्ट लोकेशन टेक्नॉलॉजी कंपनी 'टॉमटॉम'ने तयार केला आहे. ही कंपनी 'अॅपल' आणि 'उबर'साठी नकाशे तयार करते. 

या रिपोर्टनुसार, ट्रॅफीकचा भार पेलण्याच्या बाबतीत कोलंबियाची राजधानी बोगोटा (63 टक्के) दुरऱ्या, पेरुची राजधानी लीमा (58 टक्के) तिसऱ्या आणि रुसची राजधानी मॉस्को (56 टक्के) पाचव्या स्थानावर आहे. 

या कंपनीने हा रिपोर्ट सर्वात जास्त ट्रॅफिकच्या दरम्यान लोकांना त्यांच्या अपेक्षित स्थळावर पोहोचण्यासाठी किती जास्तीचा वेळ लागतो, या आधारावर तयार केला आहे. 'टॉमटॉम'चे महाव्यवस्थापक बारबारा बेलपीयरे यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबईत जवळपास 500 कार प्रति किलोमीटर धावतात. ही संख्या दिल्लीपेक्षा जास्त आहे.

या रिपोर्टनुसार, मुंबईत फिरण्यासाठी सर्वात चांगली वेळ रात्री 2 वाजता पासून पहाटे 5 वाजताच्या दरम्यान आहे. या वेळात सर्वात कमी ट्रॅफीक असते. या तुलनेत सकाळी 8 ते 10 वाजताच्या दरम्यान 80 टक्के वेळ अधिकचा लागतो. तर सायंकाळी 5 ते 8 च्या दरम्यान वेळ लागण्याची ही टक्केवारी वाढून 102 टक्क्यापर्यंत जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai tops the list of the 403 most crowded cities in the world