सरदारपुरा हत्याकांडातील 17 जणांची शिक्षा कायम

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

अहमदाबाद - गोध्रा दंगलीनंतर 2002 मध्ये झालेल्या सरदारपुरा हत्याकांडप्रकरणी 17 जणांना जन्मठेप देण्याचा पूर्वीच्या न्यायालयाचा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र, 14 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हत्याकांडात 33 अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांना जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 76 जणांना अटक केली होती. सत्र न्यायालयाने यातील 31 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत उर्वरितांना सोडून दिले होते. आज उच्च न्यायालयाने यातील 14 जणांची मुक्तता करत उर्वरित 17 जणांची शिक्षा कायम ठेवली.

Web Title: murder of 17 persons permanent punishment