बेळगाव जिल्ह्यात माजी तालुका पंचायत सदस्याच्या मुलाचा खून

बेळगाव जिल्ह्यात माजी तालुका पंचायत सदस्याच्या मुलाचा खून

बेळगाव - संतीबस्तवाडचे माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या मुलाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला आहे. विश्वनाथ यल्लप्पा बिरमुत्ती (वय 23) असे त्याचे नाव आहे. सोमवारी (ता.28) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

संतीबस्तवाड येथील एका इंग्रजी माध्यम हायस्कूलनजीक आज एका तरुणांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर तो मृतदेह माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या विश्वनाथ याचा असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पार्टीवेळी वादावादी?
प्राथमिक माहितीनुसार रविवारी (ता. 27) रात्री विश्वनाथ हा आपल्या अन्य मित्रा समवेत पार्टीला गेला होता. पार्टीवेळी वादावादी होऊन त्याचा खून झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com