अत्याचाराला विरोध करणाऱ्या मुलीचा खून केल्याचे उघड

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

शासकीय अनुदानित आश्रमशाळेत राहणाऱ्या अनेक मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली असताना एका सातवर्षीय मुलीचा अत्याचारदरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. 
 

मुझफ्फरनगर : येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत राहणाऱ्या अनेक मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली असताना एका सातवर्षीय मुलीचा अत्याचारदरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. 

मुझफ्फरनगर येथील आश्रमशाळेतील 16 मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात सात वर्षांच्या मुलीने अत्याचारास विरोध केला असता, तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह आश्रमशाळेच्या परिसरातच पुरण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानंतर आश्रमशाळेच्या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. याठिकाणी 44 पैकी 34 मुलींची वैद्यकीय चाचणी झाली असून, त्याआधारावर 29 मुलींवर अत्याचार झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालाने 16 मुलींवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. हा अहवाल आल्यानंतरच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याप्रकरणी आश्रमशाळेचे संचालक बृजेश ठाकूरसह तीन पुरुष आणि आठ महिलांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: The murder of a girl who opposed the crime was revealed