'माझ्या नवऱ्याचा खून केलास तर मी तुझीच'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

गुजरातमध्ये एका महिलेने अनैतिक संबंधातून पतीची हत्या केली आहे. त्या महिलेने पतीच्या हत्येची सुपारी बहिणीच्या पतीलाच दिली. तू माझ्या नवऱ्याची हत्या केली, तर मी आयुष्यभरासाठी तुझीच बनून राहील, असे आमीष तिने दाखवले होते.

अहमदाबाद- गुजरातमध्ये एका महिलेने अनैतिक संबंधातून पतीची हत्या केली आहे. त्या महिलेने पतीच्या हत्येची सुपारी बहिणीच्या पतीलाच दिली. तू माझ्या नवऱ्याची हत्या केली, तर मी आयुष्यभरासाठी तुझीच बनून राहील, असे आमीष तिने दाखवले होते.

अहमदाबादजवळ असणाऱ्या जगतपूरजवळ दिलीप पांचाल नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलीपच्या मारेकऱ्याला अटक केली. दिलीप यांची सुपारी त्यांची पत्नी शिल्पाने दिली होती. शिल्पाचे गोपाल गोहील (वय 40) या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. गोपालशी लग्न करण्याचा तिचा विचार होता. मात्र, यात तिचा पती दिलीप अडथळा ठरत होता. दिलीपचा अडथळा दूर करण्यासाठी शिल्पाने त्याच्या हत्येचा कट रचला. 

सुरुवातीला तिने गोहीलला दिलीपची हत्या करण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यावर तिने स्वतःच्या बहिणीचा पती हरेशला जाळ्यात ओढले. तू माझ्या नवऱ्याचा खून केलास तर मी आयुष्यभरासाठी तुझीच होईन, असे तिने सांगितले. या आमिषाला बळी पडून हरेश हत्येसाठी तयार झाला. हरेशने दिलीपला कामानिमित्त जगतपूरलगतच्या अज्ञातस्थळी भेटायला बोलावले. यावेळी खूनाचा प्रयत्न यानंतर, हरेशने पुन्हा दिलीपला भेटायला बोलावले. यावेळी हरेशचा डाव यशस्वी ठरला. त्याने दिलीपवर चाकूने वार करुन त्याची हत्या केली.

Web Title: Murder my husband and I will be your mistress