तालिबानकडून लोकगीत गायकाची हत्या

तालिबान्यांची जुलमी राजवट परतली
taliban
talibansakal

काबूल : एकीकडे सरकार स्थापण्याच्या हालचाली करणाऱ्या तालिबान्यांनी सत्ता अधिकृतरीत्या हाती घेण्यापूर्वी अत्याचार सुरुच ठेवले आहेत. बंडखोरी होत असलेल्या बाघलान प्रांतात आपला वचक निर्माण व्हावा म्हणून एका लोकप्रिय लोकगीत गायकाची हत्या करण्यात आली. फवाद अंदाराबी असे त्यांचे नाव आहे. पहाडी भागातील या घटनेमुळे तालिबानची जुलमी राजवट पुन्हा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले. (InterNational News)

taliban
सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्याने मिळवला पहिला मान

फवाद यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना शेतामधील घरातून बाहेर नेण्यात आले आणि डोक्यात गोळी झाडण्यात आली. बाघलान हा प्रांत काबूलच्या उत्तरेस सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. फवाद यांच्या आडनावाचा तेथील अंदाराबी खोऱ्याशी संदर्भ आहे. या प्रांतातील काही जिल्हे अजूनही तालिबानच्या विरोधातील लढवय्यांच्या नियंत्रणाखाली आहेत.

आधी येऊन चहा पिऊन गेले

फवाद यांचे पुत्र जावाद यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, तालिबानी याआधी आमच्या घरी आले होते आणि त्यांनी झडती घेतली होती. त्यावेळी ते वडिलांबरोबर चहा सुद्धा प्यायले होते, त्यानंतर मात्र शुक्रवारी काहीतरी बिघडले.

taliban
अल्पवयीन मुलाला दिली कोरोनाची लस, आजारी पडल्यावर दिले चौकशीचे आदेश

जन्मभूमी, देशबांधव, देशाविषयी गायन

घिचाक हे सतारीसारखे तंतुवाद्य फवाद वाजवायचे. ते पारंपारिक लोकगीते गायचे. जन्मभूमी, देशबांधव आणि एकूणच अफगाणिस्तानवर त्यांची गिते आधारलेली असत. एका ऑनलाइन व्हिडिओत पर्वतांच्या पार्श्वभूमीवर गालिचावर बसलेले फवाद तन्मयतेने गात असल्याचे दिसते. माझ्या मायभूमीइतका सुंदर देश जगात कुठेही नाही, आमच्या राष्ट्राचा अभिमान वाटतो, आमचे खोरे, आमच्या आजोबा-पणजोबांची मायभूमी प्रेक्षणीय आहे, असा या गीताचा अर्थ आहे.

तालिबानी म्हणतात चौकशी करू

जावाद यांनी पित्याच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली. ते निरपराध होते, ते फक्त लोकांचे मनोरंजन करणारे गायक होते, असे त्याने नमूद केले. त्यावर तालिबानच्या कौन्सिलने मारेकऱ्यांना शासन करण्याचे आश्वासन दिले. प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीद याने इतकेच सांगितले की, आम्ही याप्रकरणी चौकशी करू. याविषयी आणखी तपशील मात्र त्याने दिला नाही.

taliban
टोमॅटो उत्पादकांसमोर मोझॅकचं संकट ते देवमाशाला होते चार पाय, नवं संशोधन

यूएन प्रतिनिधी चिंताक्रांत

सांस्कृतिक हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांनी नेमलेल्या विशेष प्रतिनिधी करीमा बीनौन यांनी अंदाराबी यांच्या हत्येमुळे तीव्र चिंता व्यक्त केली. कलाकारांच्या मानवी हक्कांचा तालिबानने आदर करावा अशी मागणी जगातील देशांनी करावी असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले.

बदल नाहीच

अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या महत्त्वाच्या संस्थेच्या सरचिटणीस अॅग्नेस कॅलामार्ड यांनी या हत्येचा जाहीर निषेध केला. त्यांनी ट्विट केले आहे की, २०२१ चे तालिबान २००१ प्रमाणेच असहिष्णू, हिंसक आणि अत्याचारी असल्याचे वाढते पुरावे मिळत आहेत. २० वर्षांनंतर सुद्धा या आघाडीवर कोणताही बदल झालेला नाही, हे या हत्येमुळे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com